Bhosari: अबब ! भोसरीतील लघुउद्योजकाला महावितरणचे तब्बल 8 कोटींचे वीजबिल

Bhosari: MSEDCL's electricity bill of Rs 8 crore for small scale entrepreneurs in Bhosari भोसरी ए-सेक्टरमध्ये मेसर्स साई प्रोफाईल या लघु उद्योगाला महावितरणकडून 8 कोटी 58 लाख 985 रुपयांचे छापील वीजबिल वितरीत करण्यात आले.

एमपीसी न्यूज- लॉकडाउनच्या काळात शहरातील उद्योग बंद होते. मात्र, त्यामध्ये देखील उद्योगनगरीमधील एका उद्योजकाला तब्बल 8 कोटी 58 लाख 985 रुपयांचे केवळ छापील वीजबिल पाठवण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे.

दरम्यान, हे वीजबिल नजरचुकीने वितरीत करण्यात आल्याचे महावितरणने सांगितले आहे.

भोसरी ए-सेक्टरमध्ये मेसर्स साई प्रोफाईल या लघु उद्योगाला महावितरणकडून 8 कोटी 58 लाख 985 रुपयांचे छापील वीजबिल वितरीत करण्यात आले. हे बील सदोष असल्याचे महावितरणच्या अंतर्गत संगणकीय प्रणालीतून लक्षात आले व चुकीचे वीज बील दुरूस्त करून 85850 रुपयांचे नवीन बिल तयार करण्यात आले. तेव्हा कुठं ग्राहकाचा जीव भांड्यात पडला.

महावितरण कंपनीने याबाबत खुलासा करताना असे सांगितले की, प्रिटिंगसाठी पाठविण्यात येणाऱ्या वीजबिलांच्या फाईलमध्ये या ग्राहकाच्या जुन्याच सदोष वीजबिलाची फाईल नजरचुकीने पाठविण्यात आली व बिलाची छपाई होऊन त्याची प्रत संबंधीत ग्राहकास देण्यात आली.

मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित ग्राहकास या चुकीच्या वीजबिलाबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच दुरुस्त केलेले वीजबिल सुद्धा त्यांना देण्यात आल्याचे महावितरणने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.