Bhosari News : पोलिसाकडून विवाहित इंजिनीयर महिलेवर बलात्कार, फेसबुकवर झाली होती मैत्री

एमपीसी न्यूज – पुणे वाहतूक शाखेतील पोलीस कर्माचा-याने विवाहित इंजिनीयर महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने महिलेचे नग्न फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. दोघांची फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. मोशी व आकुर्डीसह इतर ठिकाणी 15 सप्टेंबर 2021 ते 11 फेब्रुवारी 2022 या कालावधीत ही घटना घडली. 

विक्रम गणपत फडतरे (वय 34, रा. भिलारेवस्ती, पुणे) असे अटक पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 376, 504, 506 प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडित 30 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. 22) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रम फडतरे हा पुणे शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेचा कर्मचारी आहे. पीडित फिर्यादी महिला ही विवाहित असून एका खाजगी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करते. पोलीस कर्मचारी असलेल्या विक्रम फडतरे याने इंजिनीयर महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर तिच्याशी मैत्री वाढवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, इंजिनीयर महिलेचे नग्न फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीशी वारंवार मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले, असे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी अटक असून, भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.