Bhosari News : दुचाकीवरील चोरटयांनी तीन पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या तीन नागरिकांचे मोबाइल दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. हिसकावले. ही घटना शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी एमआयडीसी भोसरी येथे घडली.

रूषीकेश प्रकाश फडतारे (वय 25, रा. भगतवस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फडतारे हे शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास स्वामी समर्थ शाळा, एमआयडीसी भोसरी येथून रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातील सहा हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावून नेला.

त्यानंतर चोरट्यांनी मेहफूज सतार शेख यांचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन हिसकावला. तसेच वर्षा बाळासाहेब थोरात यांचा तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन, असे एकूण 19 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाइल चोरट्यांनी चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.