Bhosari : सिंगापूर टूरच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – महिलेला आणि तिच्या पतीला(Bhosari) सिंगापूर येथे टूरला नेतो, असे आमिष दाखवून एक लाख 40 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑगस्ट 2023 ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari)फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश सावंत (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad : शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी 10 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला आणि त्यांच्या पतीला सिंगापूर येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी मार्फत टूरला नेतो असे आमिष दाखवले.

त्या टूरसाठी प्रत्येकी 70 हजार 200 रुपये खर्च येणार असून दोघांचे एक लाख 40 हजार 400 रुपये आरोपीने घेतले. त्यानंतर फिर्यादीस सिंगापूर येथे टूरला न नेता त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.