Chakan : बोरचा ट्रकखाली चिरडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पाण्याच्या बोरचा ट्रक अंगावरून (Chakan)गेल्याने चिरडून एका कामगार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 30) दुपारी दोन वाजता चाकण येथील नायकोडीवस्ती येथे घडली.

संतलाल शंकरलाल धुमकेती (वय 22, रा. झीत्राईमळा, चाकण. मूळ रा. मध्य प्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतलाल याचा भाऊ अंगद शंकरलाल धुमकेती याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राहुल अंकुश नायकोडी (वय 38, रा. झीत्राईमळा, नायकोडीवस्ती, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटी 10 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Chakan)नायकोडी यांच्या घरासमोर पाण्याची बोर घेण्यासाठी ट्रक पार्क केला होता. आरोपी अंगद आणि त्याचा भाऊ संतलाल हे दोघेही त्या ट्रकवर काम करत होते.

भाऊ संतलाल हा ट्रकखाली झोपला असताना अंगद याने निष्काळजीपणे ट्रक चालू करून पुढे घेतला. त्यावेळी बोरच्या ट्रकचे चक संतलाल याच्या डोक्यावरून गेले आणि त्यात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.