गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Bibwewadi Police: बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीला केले तडीपार

एमपीसी न्यूज : परिसरात सतत चोऱ्या करणाऱ्या आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी तडीपार केले आहे. समीर दिलीप रेणूसे (वय.22 रा. बिबवेवाडी) असे तडीपार आरोपीचे नाव आहे. (Bibwewadi Police) वाढत्या तक्रारीमुळे पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार केले आहे.

Tata Motor’s: टाटा पंच ठरली सर्वात वेगवाने, 1 लाख विक्रीचा टप्पा पार करणारी एसयूव्ही

रेणूसे हा बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या मजूर वर्गाकडे सतत भुरट्या चोऱ्या करत होता.त्याच्यावर 2018 सालपासून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आत्तापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या वाढत्या तक्रारीमुळे पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून 9 ऑगस्ट 2022 पासून पुढील 2 वर्षासाठी तडीपार केले आहे.(Bibwewadi Police)त्यामुळे संबधीत आरोपी पुणे जिल्ह्यात दिसून आल्यास बिबवेवाडी पोलिसांना खबर द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे,सहायक पोलीस उप निरीक्षक राजकुमार बोरबोले, पोलीस नाईक दैवत शेडगे व पोलीस शिपाई अनिल डोळसे यांनी केली.

 

 

spot_img
Latest news
Related news