Anil Deshmukh Arrested : मोठी बातमी ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक 

एमपीसी न्यूज – मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. आज मंगळवारी (दि.02) 11 वा. त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 

अनिल देशमुख सोमवारी ईडी कार्यालयात हजर झाले. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. 100 कोटी वसुली प्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 4 ते 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती.

अनिल देशमुख सोमवारी ईडी कार्यालयात हजर झाले. गेल्या 13 तासांपासून त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर मध्यरात्री उशिरा अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.