Talegaon Dabhade News : भगवान महावीर यांची जयंती तळेगाव शहरात उत्साहात साजरी

एमपीसी नीज – अहिंसेचे पुजारी संपूर्ण जगाला ‘जीओ और जीने दो’ असा संदेश देणारे जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर श्री भगवान महावीर यांची जयंती तळेगाव दाभाडे शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.

जीरावाला जैन टेम्पल ट्रस्ट या मंदिरातून सकाळी शोभायात्रेला सुरुवात झाली शोभायात्रेमध्ये घोडे, उंट, केंद्र ध्वजा, चांदीचा रथ, संस्कार वा टीकेच्या मुला मुलांनी मुला मुलींनी केलेला विशेष पेहराव हे लोकांचं लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेमध्ये महिलांचा व तरुण वर्गाचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात दिसून आल. सुमतीलाल फुलचंद मेहता यांनी महाप्रसादाचे वाटप केले.

जीरावाला टेम्पल ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अनिलभाई मेहता, भवरमल संघवी, दिनेश वाडेकर व रमेश निबजिया यांनी नियोजन केले. जैन सोशल ग्रुपच्या वतीने आरोग्य शिबिराचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य शिबिराचे उदघाटन तळेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत व वडगावचे नगरसेवक भूषण मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. चारशे लोकांनी हिमोग्लोबिन चाचणी केली. तर 74 लोकांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास सम्मेद ओसवाल यांच्या वतीने चांदीचा शिक्का भेट देण्यात आला.

जैन सोशल ग्रुपच्या वतीने 1998 पासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे कौतुक करून जैन समाज हा सामाजिक कार्यात अग्रेसर आहे असे प्रतिपादन मधुकर सावंत यांनी केले आपण सुद्धा या समाजाचे देणे लागतो. जैन धर्माची अहिंसेची शिकवण या जगाने घ्यावी असे भूषण मुथा यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत प्रकाश ओसवाल, सूत्रसंचालन किरण ओसवाल, तर आभार संजय संघवी यांनी मानले. नियोजन संजय अमृतलाला, विनोद राठोड,राकेश ओसवाल, हितेश राठोड, इंद्रकुमार ओसवाल, घनश्याम राठोड, राजेंद्र शाह व भरत राठोड यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.