Pimpri Crime News : कोयता बाळगल्याप्रकरणी आकुर्डी, भोसरी येथे कारवाई, तिघांना अटक

एमपीसी न्यूज – कोयता बाळगल्याप्रकरणी आकुर्डी, भोसरी येथे पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. आकुर्डी येथे रिक्षात आरोपीने कोयते ठेवले होते. गुरूवारी (दि.14) ही कारवाई करण्यात आली.

कुटे आर्केड समोर रोडवर आकुर्डी येथे गुंडा विरोधी पथकाने कारवाई करत दोघांना अटक केली. ऋतीक अनिल जाधव (वय 22, रा. दत्तवाडी, आकुर्डी) आणि मनिष विजय जाधव (वय 19, रा. पंचतारानगर, आकुर्डी) असे अटक आरोपींची नावे आहेत.

तसेच आरोपी प्रतिक वाघ (वय 22) व श्रेयस पवार (वय 20) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या रिक्षा नंबर एम एच 12 एन डब्लु 3830 या रिक्षात दोन कोयते ठेवल्याचे आढळून आले. पोलीस नाईक विजय दत्तात्रय तेलेवार (वय 38) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चौघांविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, भोसरी पोलिसांनी असीफ इस्माईल शेख (वय 25, रा. सद् गुरूनगर, भोसरी) याला अटक केली आहे. आरोपीने लोखंडी कोयता जवळ बाळगला होता. पोलीस शिपाई सचिन विष्णु सातपुते (वय 28) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.