Chinchwad Crime News : पाच लाख रूपयांचे कर्ज काढून अनोळखी इसमाकडून फसवणूक

एमपीसी न्यूज – केवायसी अपडेट करण्यास मदत करतो असे सांगून क्वीक सपोर्ट हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर नेट बँकिंगद्वारे 90 हजार रूपये काढून घेतले तसेच, पाच लाख रूपयांचे कर्ज काढून इसमाची फसवणूक केली. 22 फेब्रुवारी 2022 रोजी पूर्णानगर, चिंचवड येथे ही घटना घडली.

मुरलीधर चंद्रशेखर रानडे (वय 63, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सहा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहा खाते धारक आणि क्वीक सपोर्ट या मोबाईल अॅप विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अनोळखी इसमाने फोन करून तुम्हाला केवायसी अपडेट करण्यास मदत करतो असे सांगितले. त्यानंतर क्वीक सपोर्ट या मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅप डाऊनलोड केल्यावर आलेला सहा अंकी नंबर आरोपीला पाठविण्यात आला. आरोपीने फिर्यादी च्या खात्यावरून 90 हजार रूपये काढून घेतले. आरोपीने फिर्यादीच्या खात्यावर ऑनलाईन पाच लाख रूपये कर्ज काढून ती रक्कम वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतली असे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.