Mission Baramati : भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्री आजपासून बारामती दौऱ्यावर, मिशन बारामतीला प्रारंभ

एमपीसी न्यूज : 2024 साली बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायचा या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. सर्व शक्ती पणाला लावून हा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजप मैदानात (Mission Baramati) उतरला आहे. भाजपच्या या मिशन बारामतीची सुरुवात आज पासून सुरू होणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा तीन दिवसीय दौरा आजपासून सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांचा हा तीन दिवसीय दौरा होणार आहे. या दौरा दरम्यान त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत, संघटनात्मक आढावा घेणार आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. 
मागील तीन टर्मपासून सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. पुणे जिल्ह्यात पवार कुटुंबीयांचा दबदबा आहे. त्यात बारामती हा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला समजला जातो. हाच बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निर्मला सीतारामन या तीन दिवसाच्या बारामती दौऱ्यावर आहेत.

दरम्यान निर्मला सीतारामन जरी दौऱ्यावर येणार असल्या (Mission Baramati) तरी खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र बारामतीत त्यांचं स्वागत केलं. मंगळवारी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या भाजपचे हे आव्हान मी सहज स्वीकारत आहे. निर्मला सीतारामन यांनी बारामतीत आल्यानंतर त्यांनी इथल्या संस्था पहाव्यात, कृषी विज्ञान केंद्र पहावे त्यांना जर वेळ असेल तर मी स्वतः त्यांना फिरून बारामती दाखवेल असे देखील त्या म्हणाल्या.
निर्मला सीतारामन यांच्या या बारामती दौऱ्यात अनेक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीपर्यंत बारामतीत 21 कार्यक्रम घेण्याचे भाजपचे नियोजन आहे. यातील पहिल्या कार्यक्रमासाठी थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.