Haveli : सतत येणाऱ्या अपयशाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : आयुष्यात सतत येणाऱ्या अपयशाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला (Haveli) आहे. हवेली तालुक्यातील होळकरवाडी येथील कानिफनाथ गडाच्या दरीत मंगळवारी ही घटना घडली. अमोल अशोक आगळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एका झाडाला गळफास घेत या तरुणाने आपले जीवन संपवले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कानिफनाथ गडाच्या रस्त्याने जात असताना काही गुराख्यांना एक दुचाकी दिसून आली. तेथून काही अंतरावरच त्यांना एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक तरुण दिसून आला. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Haveli) पाठवला.

Hadapsar Crime : अंडी उधार देण्यास नकार दिल्याने विक्रेत्याला मारहाण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.