Hadapsar Crime : अंडी उधार देण्यास नकार दिल्याने विक्रेत्याला मारहाण

एमपीसी न्यूज : अंडी उधार (Hadapsar Crime) देण्यास नकार दिल्याने अंडी विक्री करणाऱ्याला बेदम मारहाण करत त्याच्या दुकानाची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील वेताळबाबा वसाहत या ठिकाणी 18 सप्टेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी बाळू भीमराव डोके (वय 37) याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. आयुब असलम शेख (वय 27) यांनी ही तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गाडीतळ परिसरातील वेताळबाबा वसाहत या ठिकाणी फिर्यादी यांचे चिकन व अंड्याचे दुकान आहे. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बाळू डोके त्या ठिकाणी आला आणि त्याने फिर्यादी यांना उधार अंडी मागितली. फिर्यादी याने ती देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर दुकानातील अंडी फोडून साहित्याची (Hadapsar Crime) तोडफोड केली.

Hadapsar Rape Case : कंपनीच्या कामानिमित्त सुरतला घेऊन गेला अन् सहकारी महिलेवर बलात्कार केला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.