YCMH News: आयुर्वेदिक उपचारांना ‘ब्रेक’, आयुर्वेद विभाग 2 वर्षांपासून बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कोविडच्या काळात आयुर्वेदालाच ब्रेक लावण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून वायसीएममधील आयुर्वेद विभाग बंद आहे.

महापालिकेचे वायसीएम या रुग्णालयात शहरासोबतच राज्याच्या काना – कोप-यातून नागरिक उपचारासाठी येत असतात. अनेक आजारांवर आयुर्वेदात रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते. अ‍ॅलोपॅथीच्या तुलनेत स्वस्त आणि इतर दुष्पपरिणाम नसलेली ही हिंदुस्थानी चिकित्सा पध्दतील वायसीएम प्रशासन आणि महापानिलकेच्या वैद्यकीय विभागाने एक प्रकारे बंदच करुन टाकले आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) गेल्या अनेक वर्षापासून आयुर्वेद विभाग कार्यरत होता; मात्र कोरोनाच्या काळात हा विभाग इतर बाह्य रुग्ण विभागाप्रमाणे (ओपीडी) तात्पुरता बंद करण्यात आला.कोरोना रुग्णांची संख्या घटल्यावर इतर बाह्य रुग्ण विभाग पूर्वीप्रमाणे सुरु करण्यात आले. मात्र हा विभाग अद्यापही बंदच ठेवण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात आयुष मंत्रालयाच्यावतीने नागरिकांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध काढे पिण्याची सूचना देण्यात येत होती. याचा फायदाही नागरिकांना झाल्याचे म्हटले जात आहे.मात्र  महापालिकेने आयुर्वेदिक विभागच बंद ठेवल्याने आता दाद तरी कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वायसीएम रुग्णालयातील हा विभाग लवकरात लवकर सुरु करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ”रुग्णालयातील आयुर्वेदिकची ओपीडी बंद आहे. कोरोना रुग्णांसाठी रुग्णालय राखीव ठेवण्यात आले होते. तेव्हा ओपीडी बंद करण्यात आली होती. याबाबत माहिती मागितली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.