India Corona Update : चोवीस तासांत देशात 6,984 तर, केरळमध्ये  3,377 नवे कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असला तरी केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 6 हजार 984 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 3 हजार 377 रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने  प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 47 लाख 10 हजार 628 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 41 लाख 46 हजार 931 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट  98.37 टक्के एवढा झाला आहे.

 

सध्या 87 हजार 562 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 247 रुग्ण दगावले असून, देशात आजवर 4 लाख 76 हजार 135 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.37 टक्के एवढा झाला आहे.

देशात आतापर्यंत 65.88 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच, कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 134.61 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 68.89 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.