Pune News : ज्येष्ठ नागरिकाची सव्वा कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अटकेत

एमपीसी न्यूज : दत्तवाडी पोलिसांनी एका बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. त्याने एका ज्येष्ठ नागरिकाला कोकणात जागा विकसित करून देतो असे सांगून तब्बल 1 कोटी 25 लाख रुपयांना गंडा घातला. हेमंत विष्णू मराठे वय 56) असे अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी संजय कुलकर्णी (वय 65) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी संजय कुलकर्णी आणि बांधकाम व्यावसायिक हेमंत मराठे यांची फार पूर्वीपासून ओळख आहे. याच ओळखीचा गैरफायदा घेऊन मराठे यांनी फ्लॅटचा प्लॅन, इमारत बांधण्याची जागा प्रत्यक्ष दाखवून डेव्हलप करत असलेले एग्रीमेंट दाखवले. तसेच फिर्यादी यांना सवलत मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी 25 लाख 50 हजार रुपये घेतले.

ही सर्व रक्कम घेत असताना मराठे यांनी संजय कुलकर्णी यांच्या सोबत कोणताही करार केला नाही. तसेच फिर्यादी यांना फ्लॅट व रक्कमही परत दिली नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजय कुलकर्णी यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी हेमंत मराठे यांना अटक केली. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.