Kalewadi burglary : तापकीरनगर येथे एका रात्रीत 2 फ्लॅटमध्ये घरफोडी

एमपीसी न्युज – दोन फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने तीन लाख 17 हजार 500 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.(Kalewadi burglary) ही घटना शनिवारी (दि. 29) तापकीरनगर काळेवाडी येथे घडली.

प्रकाश ज्ञानदेव माने (वय 52, रा. तापकीर नगर, काळेवाडी. मूळ रा. सातारा) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 31) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या फ्लॅटला कुलूप लावून 25 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील मूळ गावी गेले होते. ते 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री गावाहून परत आले.(Kalewadi burglary) त्यावेळी त्यांच्या फ्लॅटचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी घरात पाहणी केली असता त्यांच्या घरातून 31.5 ग्रॅम वजनाचे 2 लाख 32 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

Pimple Gurav : घरात साठवून ठेवलेली दोन लाख रुपयांची तंबाखू जप्त

तसेच माने यांच्या शेजारी राहणारे मानसिंग शिवराम बर्गे (वय 51) यांच्या घरातून 20 ग्रॅम वजनाचे 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 25 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे उघडकीस आले.(Kalewadi burglary) दोन्ही घरातून एकूण तीन लाख 17 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.