Chakan Crime News : चाकण, हिंजवडी, देहूरोडमध्ये चार चो-या; साडेसात लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण येथे कंपनी परिसरातून कॉपर स्क्रॅप, हिंजवडी मधून एक मोबाईल आणि दुचाकी तर देहूरोड मधून एक दुचाकी चोरीला गेली आहे. चारही घटनांमध्ये एकूण सात लाख 54 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरला. याप्रकरणी रविवारी (दि. 14) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनोज वसंतराव पंडित (वय 52, रा. भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महाळुंगे येथे सिग्मा अलॉय प्रा. ली. या कंपनीत पत्र्याच्या कंटेनरमध्ये साडेचार टन कॉपर स्क्रॅप ठेवले होते. चोरट्यांनी कंटेनरचे कुलूप तोडून कंटेनरमधून 1100 किलो सात लाख 15 हजारांचे स्क्रॅप चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

ज्ञानेश्वर अशोक गोमासे (वय 21, रा. मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरात उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. घरातून चार हजारांचा एक मोबाईल फोन चोरट्याने चोरून नेला.

सुरज संतोष केंजळे (वय 23, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने म्हाळुंगे नांदे रोडवरून भर दिवसा केंजळे यांची 20 हजारांची दुचाकी चोरून नेली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

तेज बहादूर (वय 26, रा. शिंदेवस्ती, रावेत. मूळ रा. नेपाळ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरासमोरून चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.