Pimpri Crime News : किराणा दुकानातून गुटख्याची विक्री; तिघांवर गुन्हा, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – किराणा दुकानातून प्रतिबंधित गुटखा विक्री केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 13) सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर, पिंपरी येथे करण्यात आली.

तेजमल हरकचंद सुंदेचा (वय 42), राजेंद्र किसन साठे (वय 49, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), सागर पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तेजमल आणि राजेंद्र या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तेजमल याचे संत तुकाराम नगर येथे कानिफनाथ जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात त्याने शासनाने प्रतिबंधित केलेला एक लाख 95 हजार 170 रुपयांचा गुटखा विक्रीसाठी ठेवला. आरोपी राजेंद्र याने त्याची खोली गुटखा साठवणूक करण्यासाठी उपलब्ध करून दिली. तर आरोपी सागर पाटील याने गुटखा विक्रीसाठी आरोपी तेजमल याला पुरवला. पोलिसांनी कारवाई करत गुटखा जप्त करून दोघांना अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.