Chakan : भरधाव बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव बसने एका पादचारी व्यक्तीला धडक (Chakan)दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी तीन वाजताच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावर घडली.

बाबाजी रामभाऊ दौंडकर (वय 55, रा. दौंडकर वाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण बाबाजी दौंडकर (वय 30) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील सोपान घाटे (वय 37, रा. लांडेवाडी, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

Pune : शनिवारवाडा परिसरात असलेल्या जुन्या वाड्यांचे पुनर्विकास आवश्यक : नगरसेवकांची माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे (Chakan)वडील बाबाजी दौंडकर हे चाकण-तळेगाव रस्त्याने चालत जात होते. त्यावेळी आरोपी सुनील घाटे त्याच्या ताब्यातील बस (एमएच 14/सीडब्ल्यू 0823) भरधाव वेगात चालवत आला. भरधाव बसने बाबाजी यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.