Chakan Police : आष्टी येथून मुंबईला गोवंश सदृश्य मांस घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – आष्टी येथे गोसदृश जनावरांची कत्तल करून ते मांस मुंबईला घेऊन जात असलेल्या दोघांना चाकण पोलिसांनी (Chakan Police) अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 25) पहाटे चाकण-शिक्रापूर रोडवर शेलपिंपळगाव ते मोहितेवाडी फाटा येथे करण्यात आली.

अस्लम फकीर मोहम्मद शेख (वय 42), नोवीद नशीर शेख (वय 25, दोघे रा. खरशिंदे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई अतुल कोंढवळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Theft Crime : महिलेचे अडीच लाखांचे मंगळसुत्र हिसकावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी (Chakan Police) त्यांच्या ताब्यातील पिकअपमध्ये गोंवंश सदृश्य जनावरांची आष्टी येथे कत्तल केली. तिथून ते मांस नालासोपारा मुंबई येथे घेऊन जात असताना चाकण पोलिसांनी टेम्पोवर कारवाई करून 1 हजार 600 किलो मांसासह टेम्पो ताब्यात घेतला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.