Chakan: शिंदे गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरी; रुक्मिणीदेवीच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले

Chakan: Theft at Vitthal Rukmini temple in Shinde village; snatched the mangalsutra from Rukmini neck अज्ञात चोरट्याने मंदिराच्या उघड्या दरवाजातून गाभाऱ्यात प्रवेश केला. देवीच्या गळ्यातील हे पंधरा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र चोरून नेले.

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील शिंदे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे. अज्ञात चोरट्यांनी रुक्मिणीदेवीच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र चोरुन नेले आहे.

या प्रकरणी मंदिराचे पुजारी आणि ट्रस्टचे अध्यक्ष बबन दशरथ घनवट (वय 55, रा. शिंदे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 17 जुलै रोजी सकाळी सात ते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खेड तालुक्यातील शिंदे गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. मंदिरात रुक्मिणीदेवीच्या गळ्यात सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र होते.

अज्ञात चोरट्याने मंदिराच्या उघड्या दरवाजातून गाभाऱ्यात प्रवेश केला. देवीच्या गळ्यातील हे पंधरा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र चोरून नेले.

भरदिवसा हा प्रकार घडल्याने शिंदे ग्रामस्थांमधून चीड व्यक्त केली जात आहे. देवळातील देव देखील सुरक्षित नसल्याची चर्चा पंचक्रोशीत केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.