Chakan : किराणा दुकानासमोरून तेलाचा डबा चोरणारा चोरटा अटकेत

0

एमपीसी न्यूज – किराणा दुकानासमोरून तेलाचा डबा चोरणा-या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 16) रात्री आठ वाजता बालाजीनगर, मेदनकरवाडी येथील बालाजी ट्रेडर्स येथे घडला.

योगेश वसंता कोथाळकर (वय 28, रा. चाकण. मूळ रा. बुलढाणा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत शशिकांत बटूसिंग जाधव (वय 39, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण) यांनी शनिवारी (दि. 17) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांचे बालाजीनगर येथे बालाजी ट्रेडर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता आरोपी योगेश याने दुकानासमोरून 15 लिटरचा एक हजार 200 रुपये किमतीचा एक तेलाचा डब्बा चोरून नेण्याचा प्रयत्न केला. चोरी करताना योगेश याला फिर्यादी यांनी पकडले. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.

शहरातील चोरट्यांनी आता आपला मोर्चा किरणा दुकानांकडे वळवला आहे. हिंजवडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी किराणा मालाच्या दुकानात चोरी करत साबणाचे बॉक्स आणि तांदळाच्या बॅग चोरून नेल्या. त्यानंतर चाकण येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.