Chandrayaan 3 – अखेर 21 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर चांद्रयान चंद्राच्या पहिल्या कक्षेत

एमपीसी न्यूज – चांद्रयान 3 ने काल (दि. 5 ऑगस्ट) चंद्राच्या पहिल्या  (Chandrayaan 3) कक्षेत यशस्वी प्रवेश केला असून आता हे यान चंद्रावर उतरण्यासाठी फक्त 18 दिवसांचा कालावधी बाकी आहे. हे यान चंद्राभोवती एकूण चार परिक्रमा पूर्ण करणार असून आज हे यान त्याची चंद्राभोवती पहिली परिक्रमा पूर्ण करेल.

भारत आणि इस्रोने सलग तिसऱ्या वेळी ठरल्याप्रमाणे चंद्राच्या अचूक कक्षेत प्रवेश केला असून आता हे यान हळूहळू चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरण्याचा प्रयत्न करत आहे.

गेल्या मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) चांद्रयानाने पृथ्वीच्या सर्व परिक्रमा पूर्ण करून चांद्र हस्तांतरण कक्षेत प्रवेश केला होता. यामध्ये या यानाने पृथ्वीची अखेरची कक्षा समाप्त केली होती. तेव्हा चांद्रयान 3 ची निश्चित कक्षा 288 किमी x 369328 किमी याप्रमाणे होती.


पुढे शुक्रवारी (दि. 4 ऑगस्ट) ही अखेरची कक्षा पूर्ण झाल्यावर (Chandrayaan 3) यानाने चांद्र हस्तांतरण कक्षेचे अर्धे अंतर कापले होते. आता काल (दि. 5 ऑगस्ट) चांद्रयान 3 ने लॅंडरसोबत जोडलेल्या प्रोपल्शन मॉड्युलच्या सहाय्याने चंद्राच्या पहिल्या म्हणजेच 164 किमी x 18074 किमी या अपेक्षित कक्षेत प्रज्वलन पूर्ण केले आहे.

इस्रोने जारी केलेल्या नवीन माहितीनुसार, आता चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी त्याची कक्षा कमी करत जाईल. तसेच या दरम्यान विक्रम लॅंडर सोबत जोडलेले प्रोपल्शन मॉड्युल लॅंडरपासून वेगळे केले जाणार आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅंडिग करण्याचा प्रयत्न करेल.

आज (दि. 6 ऑगस्ट) रात्री 11 वाजता चांद्रयान चंद्राच्या दुसऱ्या उतरत्या कक्षेत प्रवेश करेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.