Nigdi News : बुलेटवरून वर्षभर केला पाठलाग, महिलेला घेऊन जाण्यासाठी थेट पोहचला हॉटेलवर

एमपीसी न्यूज – एक वर्षापासून बुलेटवरून महिलेचा पाठलाग केला. त्यानंतर महिलेला घेऊन जाण्यासाठी ती काम करत असलेल्या हॉटेलवरती पोहचला. आणि हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ करून धमकी दिली. विनयभंगाच्या आरोपाखाली इसमाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (दि.03) रात्री 11 वा. निगडी परिसरात ही घटना घडली.

सोमनाथ अंकुश शेलार (वय 33, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. पिडीत महिलेनं याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी मागील एक वर्षापासून  फिर्यादी महिलेचा बुलेटवरून पाठलाग करून इशारे करत होता. रविवारी रात्री 11 वा आरोपी फिर्यादी काम करत असलेल्या हॉटेलवर पोहचला. हॉटेलवर येऊन कुठे आहे मला तिला घेऊन जायचं आहे, असे हॉटेल मॅनेजरला म्हणाला. त्यावेळी त्याला अडविले असता मॅनेजरला शिवीगाळ केली व धमकी दिली असे फिर्यादीत म्हटलय. आरोपी अटक असून, निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.