Chakan Crime : घरात घुसून विनयभंग व चोरी केल्या प्रकरणी एकास अटक

एमपीस न्यूज :  घरात घुसून विनयभंग व चोरी केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकास (Chakan Crime) अटक केली आहे.
याबाबत पीडीत महिलेने चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. उत्तम मंडलीक (वय 45 वर्षे, रा. पाईट, तालुका खेड) या आरोपीस या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी ह्या त्यांच्या पाईट येथील घरात 26 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारस गहू पिशवीत भरत असताना फिर्यादी यांचा सावत्र मुलगा नमूद आरोपी उत्तम मंडलीक हा घरात आला व त्यांनी आत येताच घराचा दरवाजा बंद केला.
फिर्यादीस पाठी मागून मिठी मारून वाईट शिवीगाळ केला. फिर्यादीचे ब्लॉउज फाडून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच त्यांच्या पाकिटामधील 10,000 रुपये व 5 ग्राम वजनाचे सोन्याचे मणी व एक पान असा एकूण  35,000 रुपये किंमतीचा माल जबरदस्तीने काढुन घेऊन (Chakan Crime) पळूण गेला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.