Pune – Lonavala Local Train News : लोकलचे अपडेटेड टाईमटेबल: पुणे-लोणावळा दरम्यान सात तर पुणे-तळेगाव दरम्यान एक लोकल सुरु

एमपीसी न्यूज – पुणे – लोणावळा सेक्शनमध्ये आतापर्यंत सहा लोकल ट्रेन धावत होत्या. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. पुणे-लोणावळा मार्गावर एक तर पुणे-तळेगाव मार्गावर एक अशा दोन लोकल ट्रेनची यात भर पडली आहे. या लोकल ट्रेन शुक्रवार (दि. 15) पासून सुरु झाल्या आहेत.

नव्याने सुरु झालेली पुणे-तळेगाव दरम्यान लोकल क्रमांक 01586 पुणे स्थानकावरून सकाळी 8.57 वाजता सुटेल. ही लोकल 9.47 वाजता तळेगाव स्थानकावर पोहोचेल, तर तळेगाव-पुणे दरम्यान लोकल क्रमांक 01587 तळेगाव स्थानकावरून सकाळी 9.57 वाजता सुटेल. ही लोकल 10.50 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.

नव्याने सुरु झालेली दुसरी लोकल ट्रेन पुणे-लोणावळा दरम्यान लोकल क्रमांक 01574 पुणे स्थानकावरून रात्री 7.05 वाजता सुटेल. ही लोकल रात्री 8.30 वाजता लोणावळा स्थानकावर पोहोचेल. तर लोणावळा-पुणे दरम्यान लोकल क्रमांक 01573 लोणावळा स्थानकावरून रात्री 8.40 वाजता सुटेल. ही लोकल रात्री 10.00 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.

15 सप्टेंबर पासून लोकलचे वेळापत्रक –

पुणे – लोणावळा

  •  लोकल क्रमांक (01486) पुणे स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 07.50 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01482) पुणे स्थानकावरून 08.05 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 09.25 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01586) पुणे स्थानकावरून 08.57 वाजता सुटेल. तळेगाव स्थानकावर 09.47 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01566) पुणे स्थानकावरून 15.00 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 16.20 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01488) पुणे स्थानकावरून 16.25 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 17.45 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01484) पुणे स्थानकावरून 18.02 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 19.27 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01574) पुणे स्थानकावरून 19.05 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 20.30 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01494) पुणे स्थानकावरून 20.00 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 21.30 वाजता पोहोचेल.

लोणावळा – पुणे

  • लोकल क्रमांक (01493)  स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 07.55 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01481) लोणावळा स्थानकावरून 08.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 09.45 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01587) तळेगाव स्थानकावरुन 09.57 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 10.50 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01485) लोणावळा स्थानकावरून 10.05 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 11.25 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01565) लोणावळा स्थानकावरून 17.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 16.50 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01483) लोणावळा स्थानकावरून 18.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 19.45 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01487) लोणावळा स्थानकावरून 19.35 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 20.55 वाजता पोहोचेल.
  • लोकल क्रमांक (01573) लोणावळा स्थानकावरून 20.40 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 22.00 वाजता पोहोचेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.