Chikhali News : सायकल आणण्यासाठी निघालेल्या नऊ वर्षाच्या मोहितवर काळाचा घाला

एमपीसी न्यूज –  लहाणपणी सायकल म्हणजे प्रत्येक मुलाचे स्वप्न असते, त्या सायकलचा हट्ट पुरवून घेण्यासाठी अनेकजण आई-बापाकडे तगादा लावतात. आई-वडील ही काही कालाने मुलाच्या हट्टीपुढे नते घेत ती सायकल अखेर मुलाला देतातच. (Chikhali News) असाच 9 वर्षाचा मोहित अगदी हसत-खेळत सायकल घेण्यासाठी त्याच्या आई सोबत निघाला होता. मात्र नियतीच्या मनात काही तरी वेगळे असल्याने मोडकळीस आलेली भिंत त्याच्या अंगावर पडून आईच्या डोळ्यासमोर तिचा लेकराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा धक्कादायक अपघात रविवारी (दि.12) दुपारी रोकडे वस्ती चिखली गावठाण येथे घडला.

मोहितराजे अमित भोसले (वय 9) असे मयत मुलाचे नाव असून अमित कांतीलाल भोसले (वय 40 रा. चिखली गावठाण) यांनी फिर्याद दिली असून सुरेश विठ्ठल जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

IND VS AUS : सलग चौथ्यांदा बॉर्डर गावसकर मालिका भारतीय संघाने जिंकली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा मोहितराजे हा आपल्या आईसोबत सायकल घेण्यासाठी पायी जात होता.  (Chikhali News) यावेळी आरोपी यांच्या बंगल्याची भिंत हि मोडकळीस आली होती. ती पडण्याच्या स्थितीत असतानाही त्याबद्दल कोणतीही उपाययोजना केली नाही. अन ती थेट मोहीतच्या अंगावर पडली यात मोहित गंभीर जखमी झाला व त्याचा यात मृत्यू झाला. त्यामुळे मोहित चे सायकलचे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले.याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तापस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.