Chinchwad : वाहतूक पोलिसांनी एका आठवड्यात उतरवल्या 3 हजार 435 वाहनांच्या काळ्या काचा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी ब्लॅक फिल्मिंग(Chinchwad )प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. 29 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत 3 हजार 435 वाहनांच्या काळ्या काचा उतरवल्या आहेत. काळ्या काचा उतरवून वाहन चालकांवर आर्थिक दंडाची देखील कारवाई करण्यात आली आहे.

वाहनांच्या काचा काळ्या असणे हे स्टेटस सिम्बॉल ठरत आहे. मात्र वाहनांच्या काचा काळ्या(Chinchwad )करणे, त्या पारदर्शक नसणे हा अपराध आहे. यामुळे अनेकदा अपघात, गैरकृत्ये होत असल्याचे समोर येते. काळ्या काचा असणाऱ्या वाहनातून अवैध मालाची विक्री देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनांच्या काचा पारदर्शक असणे आवश्यक आहे.

LokSabha Elections 2024 : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा 100 टक्के मतदानाचा निर्धार
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मागील आठवड्यात काळ्या काचांबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली. 3 हजार 435 वाहनांच्या काळ्या काचा उतरवून संबंधितांवर 37 लाख 91 हजार 500 रुपयांचा दंड आकारला आहे.वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले, “काळ्या काचा आणि इतर वेगवेगळ्या नियमभंगाबाबत वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम राबवून कारवाई केली जात आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून होणारी दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई टाळावी.”

https://www.youtube.com/watch?v=nJw8J0rdB7U&t=51s&ab_channel=MPCNews

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.