Chinchwad : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या मांजराला अग्निशमन विभागाकडून जीवनदान

एमपीसी न्यूज – इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या एका मांजराला अग्निशमन विभागाच्या जवानांनी जीवनदान दिले. रविवारी (दि. 26) सकाळी दहा वाजता ही घटना चिंचवड गावातील गोखले पार्क येथे घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य अग्निशमन विभागाने प्राधिकरण उपविभागाला माहिती दिली की, चिंचवड गावातील गोखले पार्क येथे एच 3 या इमारतीवर मांजर अडकले आहे. त्यानुसार लिडिंग फायरमन भाऊसाहेब धराडे, वाहनचालक पद्माकर बोरावके, फायरमन शंकर पाटील, विष्णू चव्हाण, शिवलाल, नयन कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर खिडकीच्या माळ्यावर एक मांजराचे पिल्लू अडकले आहे. जवानांनी शिडीच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावरील माळ्यावर जाऊन डब्याच्या साहाय्याने मांजराला पकडले. थोड्याच वेळात मांजराने जमिनीवर उडी मारली. जवानांना या मांजराला जीवनदान देण्यास यश मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.