Chinchwad Crime News : भाड्याने घेतलेली कार आणि भाड्याचे पैसे न देता एकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – भाड्याने घेतलेली कार आणि भाड्याचे पैसे न देता दोघांनी मिळून एकाची फसवणूक केली. ही घटना 2 फेब्रुवारी ते 19 मे या कालावधीत घडली.

नमन सहानी (वय 39, रा. लोहगाव पुणे), कल्पेश अनिल पंगेरकर (वय 33, रा. येरवडा पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सुनील नामदेव राखपसरे (वय 29, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मारुती सुझुकी ईरटीगा कार (एम एच 14 / जे एच 2375) आरोपींनी 2 फेब्रुवारी 2019 रोजी भाड्याने घेतली. भाड्याचे एक लाख 35 हजार रुपये आरोपींनी दिले नाहीत. तसेच फिर्यादी यांनी त्यांची कार परत मागितली असता आरोपींनी ‘आम्ही गाडी परत देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा’, असे म्हणून दमदाटी केली.

आरोपींनी फिर्यादी यांच्यासह अन्य लोकांच्या गाड्या भाड्याने घेऊन त्याप्रमाणे करार करून त्यांना पैसे व गाड्या परत केल्या नाहीत. आरोपींनी गाड्या आणि त्याचे भाड्याचे मिळणारे पैसे यांचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून नागरिकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.