Chinchwad : नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड मतदारसंघात महाआरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (Chinchwad) माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चिंचवड मतदार संघात महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आयोजक शुभम वाल्हेकर, सागर कोकणे, माजी नगरसेवक शिवाजी पाडूळे, सागर परदेशी यांनी दिली आहे.

नाना काटे यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त चिंचवड विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्‍यात आले आहे . यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दातांचे उपचार, हृदयरोग तपासणी, कॅन्सर शस्त्रक्रिया उपचार व तपासणी, जनरल शस्त्रक्रिया, मणक्याचे विकार शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हे शिबिर 13 ऑगस्ट रोजी नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स मंगल कार्यालय, वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन मंगल कार्यालय, रहाटणी येथील विमल गार्डन मंगल कार्यालय तसेच तापकीरनगर काळेवाडी येथे चंद्रकांत तापकीर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

Pune : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उद्घाटन

महादेव मंदिर येथे बॉडी प्लस थेरपी, वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने पिंपळे गुरव (Chinchwad) येथे 11000 वृक्ष रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.पिंपळे सौदागर लिनियर गार्डन येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 13 ऑगस्ट रोजी कापसे लान्स येथे उमेश काटे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आर.जे.अक्षय प्रस्तुत रजनी गंधा मराठी व हिंदी गाण्यांची महफील आयोजित केले आहे. राष्ट्रवादी असंघटीत कामगार सेल तर्फे मीना मोहिते यांच्या वतीने महापालिका सफाई कामगारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच महाआरोग्य शिबिरात नेत्र तपासणी करून डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मार्गदर्शन देणार आहे. दातदुखी, रूट कॅनल दातासंबंधीचे सर्व उपचाराबाबत मार्गदर्शन, ओपन हार्ट सर्जरी, लहान मुलांचे ओपन हार्ट सर्जरी, लहान मुलांचे हृदयाचे होल, वॉल बदलणे, एन्जोप्लास्टी, तोंडाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर, जनांद्रियांचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, लंग कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, घशाचा कॅन्सर, किडनी, लिव्हर व्यापी आणि सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या समस्या यांची तपासणी केली जाईल.

याचबरोबर मुतखडा मूत्राशयांचे कर्करोग, लहान मुलांच्या लघवीचे आजार, किडनी संबंधित सर्व आजार, स्लिप डिस्क, मणक्याचे ट्युमर्स, मान व पाठ दुखीचे औषधाद्वारे व लागल्यास ऑपरेशन द्वारे उपचार अशा अनेक इत्यादी आजाराने पीडित रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून उपचार करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.