Chinchwad : श्री महालक्ष्मी यात्रा उत्साहात

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील वीरशैव लिंगायत गवळी समाज व युवक संघटनेच्या वतीने श्री महालक्ष्मी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दर तीन वर्षातून एकदा होणाऱ्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

शनिवारी मोहननगर येथून चिंचवड स्टेशन येथे महालक्ष्मी मंदिरापर्यंत देवीचा गाडा आणण्यात आला. त्यानंतर देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच रविवारी पहाटे देवीचा अभिषेक व महाआरतीचा कार्यक्रम झाला. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त मंदिरात फुलांची व विद्युत रोषणाई ची सजावट करण्यात आली होती. तर, देवीची विशेष पूजा बांधण्यात आली होती.

रविवारी सायंकाळी देवीचा गाडा गावाबाहेर सोडण्यात आला. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भरातुन गवळी बांधवांनी मोठी उपस्थित लावली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गवळी समाजातील कारभारी मंडळी व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.