Chinchwad News: घरावर काळी जादू केली असल्याचे सांगत जादूटोणा करण्यासाठी उकळले 20 लाख अन महिलेवर केला बलात्कार

एमपीसी न्यूज – घरावर काळी जादू केली असल्याचे सांगत एका भोंदू बाबाने महिलेकडून महिलेकडून 20 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन महिलेची फसवणूक केली. त्यानंतर महिलेला गुंगीचा पदार्थ खायला देऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली आहे.

विनोद शंकर पवार (वय 33, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पिडीत महिलेच्या घरात वारंवार कटकटी सुरु असल्याचे त्यांनी आरोपी विनोद पवार याला सांगितले. ‘मी जादूटोणा व अघोरी विद्येचे काम करतो. मला तुमच्या घरी येऊन पहावे लागेल’ असे म्हणत पवार पिडीत महिलेच्या घरात आला.

‘तुमच्या घरावर काळी जादू केली आहे. त्यामुळे तुमच्या घरात रोज कटकटी होतात. तुमचा नवरा सात-आठ महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही. त्याकरिता मला तुमच्या घराची बांधणी करून तांत्रिक विधी करावे लागेल’ असे म्हणून आरोपीने पिडीत महिलेकडून 30 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने महिलेच्या घरात अघोरी पूजा केली.

त्यानंतर आरोपीने महिलेला काळ्या जादूची भीती दाखवून महिलेकडून तब्बल 20 लाख रुपये घेतले. महिलेला गुंगीचा पदार्थ खायला देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी भोंदू बाबाने महिलेची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून आरोपीला अटक केली.

आरोपी विनोद पवार याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक, गुंगीचे औषध देणे, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पवार याच्या विरोधात यापूर्वी सांगली येथील कुलाप पोलीस ठाण्यात दरोडा आणि वाकड पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.