Chinchwad News : ‘अभोगी’ आणि ‘जोग’ रागांच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – ऋतुराज संगीत विद्यालयाच्या (Chinchwad News) वतीने आयोजित संगीत सभेत सादर केलेल्या अभोगी आणि जोग या रागांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. यावेळी विद्यालायचे विद्यार्थी आणि गुरु माधुरी कोळपे तसेच आग्रा घराण्याच्या गायिका विदुषी संध्या काथवटे यांचे बहारदार गायन झाले.

सई ठकार, कौशिकी कलेढोणकर, मल्हार खोले, ऋतुराज कोळपे, अमृता आकणकर, संजना साळुंखे, प्रिया घारपुरे, राधा येळगावकर, सिद्धी कापशीकर यांनी यावेळी गायन सादर केले. यावेळी संगीत शिक्षक आणि रसिक श्रोते कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी प्रारंभीकच्या विद्यार्थांनी ‘जय जगदीश हरे ‘आणि’ गुरूने दिला ज्ञानरूपी वसा ‘या रचना सादर केल्या. त्यानंतर प्रवेशिका पुर्ण च्या विदयार्थ्यांनी ‘सरस्वती वंदना’ सादर केली. त्यानंतर राग ‘पुरिया धनश्री ‘, ‘मालकंस ‘, ‘पटदीप ‘ सादर करण्यात आले . विदुषी संध्या काथवटे यांनी राग ‘जोग ‘सादर केला.त्यानंतर त्यांनी ‘ किरवानी ‘ रागातील ठुमरी गायली. मैफिलीची सांगता भैरवीतील ‘पायल मोरी बाजे ‘या रचनेनी केली.

Quality Circle Forum of India : क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया चॅप्टरच्या कन्व्हेन्शनमध्ये 180 संघाचा सहभाग

कविता चक्रदेव यांनी राग ‘गौड मल्हार’ आणि श्रेया कुलकर्णी यांनी राग ‘मेघ मल्हार’ पेश केला. गुरु माधुरी कोळपे यांनी ‘रागेश्री ‘ रागाचे सुर आळविले. तर, ऋतुराज कोळपे यांनी राग ‘अभोगी ‘भावपूर्ण सादर केला. ‘हम भए बादर, गुरु तुम सागर तेरो ही जल भर बरसत दूर देस॥ तेरे सुर की धारा तेरा संदेसा न्यारा बरसावत हरित करत दूर देस॥ या बंदिशीला रसिकांची विशेष दाद (Chinchwad News) मिळाली.

विशारद पुर्ण ही पदवी प्राप्त केलेल्या सई ठकार, कौशिकी कलेढोणकर, मल्हार खोले, ऋतुराज कोळपे,
अमृता आकणकर, संजना साळुंखे, प्रिया घारपुरे, राधा येळगावकर,सिद्धी कापशीकर यांचा सत्कार जेष्ठ गुरु जयश्री लेले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभिजीत कोळपे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.