Chinchwad News: संस्कृतीचे बीजधन पेरण्याचे काम नव्या पिढीने करावे – डाॅ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहराच्या संस्कृतीमध्ये किर्तन, तमाशा आणि कुस्ती यांचा दोनशे वर्षाचा इतिहास दडला असून लोप पावत चाललेले हे बीजधन पेरण्याचे नाव नव्या पिढीने करावे, अशी भावना संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. रामचंद्र देखणे यांनी आज येथे व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा दिमाखदार सोहळा शुक्रवारी पार पडला.

‘साहित्य, संगीत, कला,क्रिडा आणि संस्कृतीची पताका फडकवत शहराच्या सांस्कृतिक वैभवाची पालखी पुढे नेण्याची कामगिरी या फौंडेशनच्या माध्यमातून होईल ‘असा विश्वास विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

मंगेशकर घराण्यातील प्रसिद्ध पार्श्वगायिका राधा मंगेशकर,पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे,आयुक्त राजेश पाटील,डाॅ नंदकिशोर कपोते, रविंद्र घांगुर्डे,खासदार श्रीरंग बारणे,वन विभागाचे पुणे परिक्षेत्र अधिकारी रंगनाथ नाईकवडे,ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील , नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे,निर्मला कुटे,ह.भ.प. पांडुरंग दातार,प्रसिद्ध होमोओपॅथिक तज्ञ डाॅ अमरसिंह निकम , माजी नगरसेवक शंकर जगताप, कुंदा भिसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर व जागतिक रंगभूमीदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास कलाप्रेमी रसिकांनी अलोट गर्दी केली होती.

फौंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.फौंडेशनच्या कलात्मक बोधचिन्हाचे अनावरण राधा मंगेशकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

आपल्या भाषणात डाॅ देखणे यांनी पुढे म्हटले की, या शहराच्या विकासामध्ये औदयोगिकरणाचा पाया रचला गेल्यानंतर अनेक बहुभाषिक लोकांनी या शहराचं नाव व संस्कृती वाढविण्यामध्ये पुढाकार घेत त्याचे स्वामित्व स्विकारले असल्याची बाब अधोरेखित केली.

आयुक्त राजेश पाटील यांनी, ‘ही संस्था शहराच्या सांस्कृतिक वारश्याचे व इतिहासाचे जपन करील ‘अशी भावना प्रकट केली. खासदार बारणे, भाऊसाहेब भोईर, नाईकवडे ,पुरुषोत्तम महाराज पाटील आदींची यावेळी भाषणे झाली.

फौंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन फौंडेशनचे सचिव विजय बोत्रे पाटील यांनी तर संतोष घुले यांनी आभार मानले.

कार्यक्रमानंतर राधा मंगेशकर यांच्या गीत संगीत मैफिलाचा कार्यक्रम पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.