CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा सपाटा, 399 फाईल्सचा निपटारा

एमपीसी न्यूज : राज्य सरकारमध्ये (CM Eknath Shinde) निर्णय प्रक्रियेला वेग आला असून नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध निर्णय झपाट्याने घेत आहेत. 1 जुलै ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे 8 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 399 फाईल्सचा निपटारा केला आहे.

विशेष म्हणजे यात नैसर्गिक आपत्तीमधील मदत, गरजूंना मदत, कृषि विभाग, मंत्री मंडळासमोर आणावयाचे प्रस्ताव, फाईल्स, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा यात समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच (CM Eknath Shinde) बैठकीत विविध विभागाच्या सचिवांना सर्वसामान्यांची तसेच जनहिताची कामे गतिमान रीतीने झाली पाहिजेत, तसेच लोकांची कामे अडणार नाहीत हे पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जनहितासाठी तत्परतेने निर्णय घेण्यात येत आहेत.

Right Step Foundation : राईट स्टेप फाऊंडेशन देत आहे व्यसनाधिंनांना नवसंजीवनी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.