Pune News : निवडुंगा विठोबा मंदिराशेजारील जागेत वारकरी भवन उभारा : स्थायी समितीपुढे प्रस्ताव

एमपीसी न्यूज : नाना पेठेतील ऐतिहासीक निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम असतो. त्यामुळे लाखो भाविकांना विश्रांतीसाठी नाना पेठेतील मंदिराशेजारील मोकळ्या जागेत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाऐवजी(एसआरए) वारकरी भवन उभारावे, असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

मुळात ही मोकळी जमीन पुणे महापलिकेच्या मालकीची असून ती प्राथमिक शाळा आणि मैदानासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. परंतु कालांतराने याठिकाणी 70 ते 80 झोपडपट्टी वसली. त्यानंतर विकसकाच्या आर्थिक फायद्यासाठी मागणी नसताना, घोषित झोपडपट्टी क्षेत्र नसताना देखील एसआरएचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रस्तावित एसआरए रद्द करत त्याठिकाणी वारकरी भवन उभारावे अशी मागणी करणारा प्रस्ताव नगरसेवक वनराज आंदेकर, नगरसेवक अब्दुल गफुर पठाण यांनी स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. यापुर्वी अनेकवेळा वारकरी भवन उभारण्यात यावे असे पत्र महापालिका प्रशासनाला दिले आहेत. परंतु याठिकाणी असलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन अन्य ठिकाणी कोठे करावे याबाबत महापालिकेपुढे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान या प्रस्तावावर लोकभावना विचारात घेऊन कार्यवाही करावी असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधी पक्षनेत्या सौ.दिपाली प्रदिप धुमाळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.