Pune : शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोना वाढतोय;  भवानी पेठेत 250 रुग्ण 

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाचे संकट आणखी गडद होत चालले आहे. या रोगाचा हॉटस्पॉट समजल्या जाणाऱ्या भवानी पेठेत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहे. सध्या या भागात  250 रुग्ण असल्याची माहिती स्मार्ट सिटीच्यावतीने देण्यात आली. 

शहरातील मध्यवस्तीतील ढोले पाटील रोड 184, शिवजीनागर – घोलेरोड 157, कसबा – विश्रामबागवाडा 134, येरवडा – कळस – धानोरी परिसरात 139, कोरोनाचे रुग्ण आहेत. या भागांत कोरोनाचा प्रकोपच झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

याशिवाय धनकवडी – सहकारनगर 62, वानवडी – रामटेकडी 58, बिबवेवाडी 33, हडपसर – मुंढवा 41, नगररोड – विश्रांतवाडी 30, कोंढवा – येवलेवाडी 16, सिंहगड रोड 11, वारजे – कर्वेनगर 9, औंध – बाणेर 4, कोथरूड – बावधन 2, पुण्याबाहेरील 53 असे 1222 कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती पुणे स्मार्ट सिटीतर्फे देण्यात आली. तर, औंध – बाणेर आणि कोथरूड – बावधन परिसरात आता प्रत्येकी 1-1 अशी कोरोनाचा रुग्णांची वाढ झाली आहे.  झोपडपट्ट्या, दाटीवाटीने असलेल्या भागांत कोरोना वाढतच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 3 मेपर्यंत लोकडाऊन जाहीर केला आहे. 40 दिवसांच्या या कालावधी दरम्यान सर्वसामान्य पुणेकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. पोलिसांनीही संचारबंदीची कडक अंमलबजावणी करून नागरिकांना बाहेर निघण्यास अटकाव केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.