Chakan News : कोरोना लस घेण्यासाठी निघालेल्या तरुणाला कोयत्याच्या धाकाने लुटले

एमपीसी न्यूज – चाकण ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी निघालेल्या तरुणाला दुचाकीवरील दोन जणांनी अडविले. कोयत्याचा धाक दाखवत त्याच्याकडील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि दोन हजार रुपये रोख रक्कम काढून घेत लुटले. ही घटना चाकण येथील आंबेठाण रसत्यावर घडली.

गणेश लक्ष्मण भालेराव (वय 25, रा. आंबेठाण चौक , चाकण) यांनी या प्रकरणी गुरुवारी (दि. 9) चाकण पोलीस फिर्याद दिल आहे. त्यानुसार, दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 30 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली. फिर्यादी लुटीच्या घटनेनंतर खूप घाबरले. त्यामुळे ते गावी निघून गेले होते. गावाहून आल्यानंतर त्यांनी उशिराने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव हे त्यांच्या राहत्या घरातून करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात निघाले होते. त्या वेळी त्यांच्या मागून दुचाकीवर दोन इसम आले. त्यांनी कोयत्याच्या धाकाने फिर्यादी यांच्याकडील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि दोन हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. चाकण पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.