Corona World Update: जगात कोरोना संसर्गाचा मोठा उद्रेक, मात्र लागण सौम्य स्वरूपाची, दिवसात 5.45 लाख नवे रुग्ण

जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 72.80 टक्के, मृत्यूदर 2.62 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 24.58 टक्के

एमपीसी न्यूज –  जगभरात काल (गुरुवारी) 5 लाख 45 हजार 903 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. आतापर्यंतचा एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे.  त्यामुळे गेले काही दिवस सातत्याने सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढताना पहायला मिळत आहे. रुग्णसंख्येत भर पडत असली तरी गंभीर अथवा चिंताजनक रुग्णांचे प्रमाण पाऊण टक्क्यापेक्षाही कमी झाले आहे.  

जगातील कोरोनाचा मृत्यूदर सातत्याने थोडा-थोडा कमी होत 2.62 टक्क्यांपर्यंत खाली आला असला तरी नवीन कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने कोरोनामुक्तांचे प्रमाण मात्र आता थोडे घसरताना तर सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण थोडे वाढताना दिसत आहे. सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढून 24.58 टक्के झाले आहे.

वाचा एमपीसी न्यूज – अंतरंगचा दसरा विशेषांक

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 53 लाख 21 हजार 659 झाली असून आतापर्यंत एकूण 11 लाख 86 हजार 243 (2.62 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 कोटी 29 लाख 93 हजार 196 (72.80 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात आता कोरोनाचे 1 कोटी 11 लाख 42 हजार 220 (24.58 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 1 कोटी 10 लाख 59 हजार 984 (99.26 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 82 हजार 236 (0.74 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

23 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 90 हजार 059, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 40 हजार 199,  मृत्यू 6 हजार 531

24 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 52 हजार 886, नवीन कोरोनामुक्त 2 कोटी 41 हजार 101,  मृत्यू 5 हजार 598

25 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 23 हजार 715, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 36 हजार 197,  मृत्यू 4 हजार 609

26 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 11 हजार 372, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 76 हजार 499,  मृत्यू 5 हजार 110

27 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 59 हजार 020, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 69 हजार 574,  मृत्यू 7 हजार 028

28 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 5लाख 04 हजार 419, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 76 हजार 406,  मृत्यू 7 हजार 104

29 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 5 लाख 45 हजार 903, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 66 हजार 003,  मृत्यू 7 हजार 172

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.