Corona World Update: एका दिवसात 2 लाख 89 हजार रुग्णवाढीचा नवा उच्चांक

Corona World Update: New high of 2 lakh 89 thousand patients in one day जगातील 61 टक्के कोरोनामुक्त, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 34.97 टक्क्यांपर्यंत खाली, कोरोना मृत्यूदर 4.03 टक्के!

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 59 लाखांच्या पुढे गेली असून त्यापैकी 97 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी 61 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कोरोना बळींचा आकडा सहा लाख 42 हजारांच्या पुढे गेला असला तरी कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 4.03 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 34.97 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. काल (शुक्रवारी) जगभरात 2 लाख 89 हजार 028 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. त्याच वेळी 1 लाख 86 हजार 707 कोरोनामुक्त झाले.  

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 59 लाख 40 हजार 379 झाली असून आतापर्यंत एकूण 6 लाख 42 हजार 688 (4.03 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 97 लाख 23 हजार 949 (61 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 55 लाख 73 हजार 742 (34.97 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 55 लाख 07 हजार 500 (98.81 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 66 हजार 242  (1.19 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

18 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 24 हजार 065, कोरोनामुक्त 1 लाख 51 हजार 019, मृतांची संख्या 5 हजार 008

19 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 20 हजार 073, कोरोनामुक्त 1 लाख 23 हजार 557, मृतांची संख्या 4 हजार 316

20 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 05 हजार 348 , कोरोनामुक्त 1 लाख 71 हजार 684 , मृतांची संख्या 4 हजार 046

21 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 39 हजार 093 , कोरोनामुक्त 2 लाख 03 हजार 626 , मृतांची संख्या 5 हजार 678

22 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 79 हजार 769 , कोरोनामुक्त 2 लाख 39 हजार 108 , मृतांची संख्या 7 हजार 113

23 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 76 हजार 000 , कोरोनामुक्त 1 लाख 85 हजार 387 , मृतांची संख्या 6 हजार 309

24 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 89 हजार 028 , कोरोनामुक्त 1 लाख 86 हजार 707 , मृतांची संख्या 6 हजार 199

अमेरिकेत एका दिवसांत 78 हजार नवे कोरोना रुग्ण 

अमेरिकेत शुक्रवारी 78 हजार 009 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 42 लाख 48 हजार 327 झाली आहे. शुक्रवारी अमेरिकेत 1 हजार 141 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 48 हजार 490 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 20 लाख 28 हजार 074 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 20 लाख 71 हजार 763 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये शुक्रवारी 1,178 कोरोना बळी 

ब्राझीलमध्ये शुक्रवारी 1,178 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 85 हजार 385 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 23 लाख 48 हजार 200 झाली असून त्यापैकी 15 लाख 92 हजार 281 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 6 लाख 70 हजार 534 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 41,908 वर

मेक्सिकोत शुक्रवारी 718 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 41,908 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 3 लाख 70 हजार 712 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 2 लाख 36 हजार 209 रुग्ण बरे झाले असून 92 हजार 595 रुग्ण सक्रिय आहेत.

भारतात शुक्रवारी 761 कोरोना बळी

भारतात शुक्रवारी 761 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. कोलंबियात 287, दक्षिण अफ्रिकेत 250, इराणमध्ये 215, रशियात 154, इंग्लंडमध्ये 123 तर अर्जेंटिनात 105 कोरोना बळी गेले. इराकमध्ये 90, इंडोनेशियात 89, बोलिवियात 79, चिलीत 76 तर पाकिस्तानात 54 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 42,48,327 (+78,009), मृत 1,48,490 (+1,141)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 23,48,200 (+58,249), मृत 85,385 (+1,178)
  3. भारत – कोरोनाबाधित 13,37,022 (+48,892) , मृत 31,406 (+761)
  4. रशिया – कोरोनाबाधित 8,00,849 (+5,811), मृत 13,046 (+154)
  5. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 4,21,996 (+13,944), मृत 6,343 (+250)
  6. पेरू – कोरोनाबाधित 3,75,961 (+4,865), मृत 17,843 (+189)
  7. मेक्सिको – कोरोनाबाधित 3,70,712 (+8,438), मृत 41,908 (+718)
  8. चिली – कोरोनाबाधित 3,41,304 (+2,545), मृत 8,914 (+76)
  9. स्पेन –  कोरोनाबाधित 3,19,501 (+2,255), मृत 28,432 (+3)
  10. इंग्लंड – कोरोनाबाधित 2,97,914 (+768), मृत 45,677 (+123)
  11. इराणकोरोनाबाधित 2,86,523 (+2,489), मृत 15,289 (+215)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,70,400 (+1,209), मृत 5,763 (+54)
  13. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,62,772 (+2,378), मृत 2,672 (+37)
  14. इटली – कोरोनाबाधित 2,45,590 (+252), मृत 35,097 (+5)
  15. कोलंबिया – कोरोनाबाधित 2,33,541 (+7,168), मृत 7,975 (+287)
  16. टर्की – कोरोनाबाधित 2,24,252 (+937) मृत 5,580 (+17)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 2,18,658 (+2,548), मृत 2,836 (+35)
  18. जर्मनी – कोरोनाबाधित 2,05,960 (+818), मृत 9,201 (+14)
  19. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,80,528 (+1,130), मृत 30,192 (+10)
  20. अर्जेंटिना –  कोरोनाबाधित 1,53,520 (+5,493), मृत 2,807 (+105)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.