Corona World Update: जगातील कोरोना बळींचा आकडा 10 लाखांच्या पुढे!

कोरोनामुक्तांच्या प्रमाणात 74 टक्क्यांपर्यंत वाढ, मृत्यूदर 3 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 23 टक्क्यांपर्यंत खाली

एमपीसी न्यूज – जगातील कोरोना बळींच्या आकड्याने काल 10 लाखांचा टप्पा ओलांडला. कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन कोटी 33 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत दोन कोटी 46 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण आता जवळपास 74 टक्के झाले आहे. मृत्युदर 3 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण सुमारे 23 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 33 लाख 06 हजार 588 झाली असून आतापर्यंत एकूण 10 लाख 02 हजार 398 (3.01 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 कोटी 46 लाख 37 हजार 867 (73.97 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 76 लाख 66 हजार 323 (23.02 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 76 लाख 01 हजार 327 (99.15 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 64 हजार 996 (0.85 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

21 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 76 हजार 575, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 84 हजार 290, मृत्यू 5 हजार 724

22 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 15 हजार 717, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 81 हजार 954, मृत्यू 6 हजार 333

23 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 16 हजार 036 , नवीन कोरोनामुक्त 2 लाख 81 हजार 929, मृत्यू 6 हजार 333

24 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 14 हजार 855, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 48 हजार 373, मृत्यू 5 हजार 872

25 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 18 हजार 804, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 49 हजार 323, मृत्यू 5 हजार 818

26 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 94 हजार 650, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 34 हजार 123, मृत्यू 5 हजार 306

27 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 51 हजार 915, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 27 हजार 194, मृत्यू 3 हजार 873

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.