Corona World Update: चिंताजनक! सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानावर!

Corona World Update: Worrying! India ranks seventh in list of most corona-infected countries!

एमपीसी न्यूज – सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत फ्रान्स आणि जर्मनीला मागे टाकत भारत नवव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहचल्याने भारतीयांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, जगभरातील एक दिवसातील नवीन कोरोना रुग्ण आणि कोरोना मृतांच्या आकड्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण आता सहा टक्क्यापेक्षा कमी झाले आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी 45.45 टक्क्यांपर्यंत वाढल्याने आता जगातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 49.52 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, या बाबी दिलासा देणाऱ्या आहेत. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 62 लाख 63 हजार 911 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 73 हजार 900 (5.97 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 28 लाख 46 हजार 713 (45.45 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 30 लाख 43 हजार 298 (48.58 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 29 लाख 89 हजार 891 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 407 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

25 मे – नवे रुग्ण 89 हजार 756, दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 096

26 मे – नवे रुग्ण 92 हजार 060, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 048

27 मे – नवे रुग्ण 1 लाख 06 हजार 475, दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 283

28 मे – नवे रुग्ण 1 लाख 16 हजार 304, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 612

29 मे – नवे रुग्ण 1 लाख 25 हजार 511, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 872

30 मे – नवे रुग्ण 1 लाख 24 हजार 102, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 084

31 मे – नवे रुग्ण 1 लाख 08 हजार 767, दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 191

भारताबरोबर टर्की, पेरू, मेक्सिको, सौदी अरेबियालाही वरचे स्थान

भारताबरोबरच पेरू, मेक्सिको व सौदी अरेबिया या तीन देशांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन त्यांनी सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत आणखी वरचे स्थान मिळविले आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, इंग्लंड आणि इटली हे देश भारताच्या पुढे आहेत.

भारतात रविवारी 8,782 इतक्या नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे भारतात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 1,90,609 झाली आहे. रविवारी भारतात 223 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 5,408 इतका झाला आहे. आतापर्यंत 91 हजार 852 रुग्णांनी भारतात कोरोनावर मात केली आहे. भारतातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 2.84 टक्के इतका मर्यादित आहे. हा मृत्यूदर जागतिक मृत्यूच्या निम्म्याहून कमी आहे, ही भारताच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.

फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटलीने मिळविले कोरोनावर नियंत्रण

फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली या तीन राष्ट्रांनी सध्या कोरोनावर खूप चांगले नियंत्रण मिळविल्याचे दिसून येत आहे. नवीन कोरोना रुग्णांबरोबरच येथील कोरोना मृतांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होणारा भारत जागतिक क्रमवारीत वर-वर चालल्याचे पाहायला मिळत आहे. जर्मनीत काल (रविवारी) केवळ पाच कोरोनाबाधितांचा तर स्पेनमध्ये  केवळ दोघांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समधील मृतांची संख्या देखील 31 पर्यंत खाली आला आहे. इटलीतील मृतांचा आकडाही रविवारी 75 पर्यंत खाली आला आहे.

पाकिस्तान 18 व्या तर बांगलादेश 21 व्या स्थानावर

पेरू दहाव्या स्थानावर तर मेक्सिको 15 व्या स्थानावर पोहचला आहे. टर्की आता 11 व्या स्थानावर आला आहे. सौदी अरेबिया 16 व्या तर चीन 17 व्या स्थानावर आहे. पाकिस्तान 18 व्या स्थानावर कायम आहे. भारताचा दुसरा शेजारी बांगलादेश आता 21 व्या स्थानावर येऊन पोहचला आहे.

अमेरिकेत 18 लाखांपेक्षा अधिक कोरोना संसर्ग

अमेरिकेत रविवारी 638 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 06 हजार 195 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 18 लाख 37 हजार 170 झाली आहे तर 5 लाख 99 हजार 867 म्हणजेच सहा लाखजण कोरोनामुक्त झाले आहेत.

US Corona Death Toll: अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या पाच लाखांच्या पुढे

ब्राझीलमध्ये रविवारी 480 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 29 हजार 314 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 14 हजार 849 झाली आहे तर 2 लाख 06 हजार 555 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मेक्सिकोमध्ये काल (रविवारी) 364, भारतात 223 तर कॅनडात 222 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. रशियात 138, पेरूमध्ये 135, इंग्लंड 113, पाकिस्तान 88, इटली 75, इराण 63, चिली 57, कोलंबिया 49, इजिप्त 46 तर बांगलादेश, दक्षिण अफ्रिका व इंडोनेशियात प्रत्येकी 40 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 18,37,170 (+20,350), मृत 1,06,195 (+638)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 5,14,849 (+16,409), मृत 29,314 (+480)
  3. रशिया – कोरोनाबाधित 4,05,843(+9,268), मृत 4,693 (+138)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 2,86,509 (+201), मृत 27,127 (+2)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,74,762 (+1,936), मृत 38,489 (+113)
  6. इटली – कोरोनाबाधित 2,32,997 (+333), मृत 33,415 (+75)
  7. भारत – कोरोनाबाधित 1,90,609 (+8,782) , मृत 5,408 (+223)
  8. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,88,882 (+257), मृत 28,802 (+31)
  9. जर्मनी – कोरोनाबाधित 1,83,494 (+200), मृत 8,605 (+5)
  10. पेरू –  कोरोनाबाधित 1,64,476 (+8,805) , मृत 4,506 (+135)
  11. टर्की – कोरोनाबाधित 1,63,942(+839), मृत 4,540(+25)
  12. इराण – कोरोनाबाधित 1,51,466 (+2,516), मृत 7,797 (+63)
  13. चिली – कोरोनाबाधित 99,688 (+4,830), मृत 1,054 (+57)
  14. कॅनडा –  कोरोनाबाधित 90,947 (+757), मृत 7,295 (+222)
  15. मेक्सिको – कोरोनाबाधित 87,512 (+2,885), मृत 9,779 (+364)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 85,261 (+1,877) मृत 503 (+23)
  17. चीन – कोरोनाबाधित 83,001 (+2), मृत 4,634 (+NA)
  18. पाकिस्तान – कोरोनाबाधित 69,496 (+3,039), मृत 1,483 (+88)
  19. बेल्जियम – कोरोनाबाधित 58,381 (+195), मृत 9,467 (+14)
  20. कतार – कोरोनाबाधित 56,910 (+1,648), मृत 38 (+2)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.