Chikhali-Gharkul : चिखली-घरकुलमध्ये येथे दहीहंडी उत्सहात साजरी

एमपीसी न्यूज – चिखली घरकूल (Chikhali-Gharkul) वसाहत येथे निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन व शिवरक्त प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते निलेशदादा नेवाळे यांच्या नेतृवाखाली घरकुल येथे शुक्रवारी (दि.19) मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. ही दहिहंडी मुंबई येथील साई सिद्धी दहीहंडी पथक, चेंबूर यांनी फोडली.  

Chikhali-Gharkul

या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, अभिनेत्री मीरा जगन्नाथ, भाजपचे नेते एकनाथ पवार, जेष्ठ कामगार नेते विष्णुपंत नेवाळे आणि घरकुलमधील विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Shanivarwada : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती साजरी

चिखली, घरकूल, नेवाळे वस्ती, हरगुडेवस्ती, कोयनानगर, घरकुल येथील परिसरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी युवक, युवती, महिला व नागरिक या उत्सहात कार्यक्रमात सामील झाले होते. यावेळी एन.एस. डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम डान्स करत उपस्थितांची मने (Chikhali-Gharkul) जिंकली. निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन व शिवरक्त प्रतिष्ठान आणि मल्हार ढोल ताशा पथक घरकुल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.