India Corona Update : दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 2.21 टक्के, रिकव्हरी रेट 97.36 टक्के 

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 38 हजार 628 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत 40 हजार 017 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी असून तो 2.21 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 97.36 टक्के एवढा आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 18 लाख 95 हजार 385 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 10 लाख 55 हजार 861 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 12 हजार 153 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

भारतात आजवर 4 लाख 27 हजार 371 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 617 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.34 टक्के एवढा आहे.

देशात आजवर 47 कोटी 83 लाख 16 हजार 964 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 50 हजार 081 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

50 कोटी लोकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस 

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. दररोज पन्नास ते साठ लाख नागरिकांना लस टोचण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेत भारताने महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असून, आत्तापर्यंत पन्नास पन्नास कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 50 कोटी 10 लाख 09 हजार 609 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आज (शुक्रवारी) रात्री सात वाजेपर्यंत 49 लाख 55 हजार 138 जणांचे लसीकरण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.