Dehuroad : दुचाकी व कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकी व कारच्या धडकेत (Dehuroad) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एफएडी 29 आर्मी एरीयाच्या समोर झाला आहे.

विजय दिनकर वानखेडे (वय 31 रा. तळेगाव दाभाडे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.8) फिर्याद दिली आहे. यावरून सचिन ज्ञानोबा कुऱ्हाडे (वय 25 रा.निगडी) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यात सागर दिनकर वानखेडे (वय 27 रा. तळेगाव दाभाडे) याचा मृत्यू या अपघातात झाला आहे.

Pune : ‘मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील स्थित्यंतरे ‘विषयावरील व्याख्यानास प्रतिसाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ सागर हा दुचाकीवरून देहूरोड येथून निगडीकडे निघाला होता. यावेळी वेगाने आलेल्या वेगनार कारने सागर याच्या दुचाकीला धडक दिली. यात सागर हा गंभीर जखमी झाला व यात (Dehuroad) त्याचा मृत्यू झाला. यावरून आरोपीवर गुन्हा दाखल केला असून देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.