Pune News : जळगाव येथील पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करा – संभाजी ब्रिगेडची मागणी

एमपीसी न्यूज – मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर पोलिस प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.मात्र ही कारवाई तात्पुरती असून त्याबाबत मराठा समाज नाखुशच आहे.संबंधित पोलिस निरीक्षकाला शासनाच्या सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी – चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सतिश काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, किरणकुमार बकाले पोलिस प्रशासनाच्या जबाबदार पदावर आपले कर्तव्य बजावित होते.राज्यासह देशातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याची जबाबदारी ही पोलिस प्रशासनाची असते.मात्र या जबाबदार पदावरील अधिकारीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे वक्तव्य करत असल्यास ते खेदजनक आहे.मराठा समाज शांतताप्रिय समाज आहे.मराठा आरक्षणाच्या मागण्यांवेळी संपूर्ण देशाला समाजाने आंदोलनाचा आदर्श घालून दिलेला आहे.मात्र जाणीवपूर्वक कोणी अपमान करत असेल तर त्या देशद्रोही मनोविकृतीला त्याच भाषेत उत्तर देखील देण्याची कुवत मराठा समाजामध्ये आहे.

Pune News : दर्जेदार बियाणे, कृषी औजारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

मराठा समाजाच्या अपमानप्रकरणी संबंधीत पोलिस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.मात्र ती पुरेशी नाही.बकाले या अधिकार्याला बडतर्फ करून शासकीय सेवेत पुन्हा रुजू करून घेऊ नये, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.अन्यथा अशा विचारांची लोक समाजात तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील.या मागणीची दखल घेऊन त्वरीत पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले याला बडतर्फ करावे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 311 अन्वये एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांनी केलेले वक्तव्य समाजामध्ये शांतता भंग आणि कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करून जातीय तेढ निर्माण करणे हे भारतीय घटनेच्या विरोधी आहे यासाठी अशा अधिकाऱ्यांना नोकरीमधून डिसमिसल कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे.अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.