Pune News : दिवाळीत घरफोड्या करणा-या चोरट्यांना अटक

29 लाखांचा मुद्देमाल जप्त

 एमपीसी न्यूजदिवाळीसाठी गावाला जाणार्या नागरीकांची घरी घरफोड्या करणाया चोरट्यांच्या हडपसर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 50 हून अधिक घरफोड्यांचे गुन्हे दाखल असलेल्या चोरट्यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा चोरलेल्या दुचाकींचा समावेश आहे.

 

सनीसिंग पापासिंग दुधानी (वय 19, रा. बिराजदारनगर, हडपसर), सोहेल जावेद शेख (वय 19, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर त्यांच्यासमवेत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीमध्ये शहरातील वाढत्या घरफोड्या, वाहनचोरी, जबरी चोरीच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी हडपसर पोलिसांच्या तपासपथकाकडून गुरुवारी रात्री साडे आठ वाजता हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालण्याचे काम सुरू होते. त्यावेळी हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार हे हडपसरमधील म्हाडा कॉलनी परिसरामध्ये फिरत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी म्हाडा कॉलनीमध्ये सापळा रचून दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साडे तीन किलो वजनाच्या चांदीच्या विटा, पाच कार असा तब्बल 29 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

आरोपींनी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे तब्बल सात व वाहनचोरीचे पास असे एकूण 12 गुन्हे केल्याचे उघडकीस आले. तर यापुर्वी आरोपीच्या नावावर घरफोड्यांचे पन्नास गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार हडपसर पोलिस ठाणे 5, लोणी काळभोर पोलिस ठाणे 2 असे घरफोडीचे सात गुन्हे आरोपींनी केले आहेत. तर चारचाकी वाहन चोरीचे दत्तवाडी, बिबवेवाडी, लोणी काळभोर, लोणीकंद, शिवाजीनगर यांच्यासह अन्य पोलिस ठाण्यातील गुन्हे असे एकूण 12 गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.