Diwali Muhurat : दीपावली मुहूर्त 2021 

एमपीसी न्यूृज (ज्योतिषभास्कर उमेश स्वामी) – यंदाच्या दिवाळीतील मुहूर्तांची माहिती एमपीसी न्यूजच्या वाचकांसाठी देत आहोत. 

रमा एकादशी – अश्विन कृष्ण 11 सोमवार 01 नोव्हेंबर 2021. सायंकाळी दारासमोर तेलाचे दिवे लावावेत. रोषणाई करावी.

गुरू द्वादशी – अश्विन कृष्ण 12. मंगळवार दि. 02 नोव्हेंबर 2021. वसु बारस – सूर्यास्ताचे वेळी गाईचे वासरासह (सवत्स गाय) पूजन करावे. गाईला उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा व खाण्यास द्यावे. त्या दिवशी गाईचे दूध व तळलेले पदार्थ खाऊ नयेत. दुधजन्य पदार्थ वर्ज्य करावे.

वसु बारस – अश्विन कृष्ण 13, मंगळ दि. 02 नोव्हेंबर 2021 (प्रदोष) (भौमप्रदोष)

व्यापारी वही खरेदी मुहूर्त 
सकाळी 9.30 ते 11 चंचल
सकाळी 11 ते 12.30 लाभ
दुपारी 12.30 ते 2 पर्यंत अमृत

यमदीपदान – अश्‍विन कृष्ण 13. मंगळवार 02 नोव्हेंबर 2021
या दिवशी सायंकाळी कणिकेचा दिवा करून घराच्या दक्षिण दिशेला ज्योती  करून लावून ठेवावा. दिव्याची पूजा करावी व पुढील श्लोक म्हणून दक्षिणेला तोंड करून यमदेवतेला नमस्कार करावा त्यामुळे अपमृत्यू टळतो.

मृत्युनां पाज्ञदंडाभ्यां कालेन श्यामपासह ।
त्रयोदश्यां दीपदप्नात सूर्यज: प्रतितां मम ।

नरक चतुर्दशी – अभ्यंगस्नान 8 अश्‍विन कृष्ण 4. गुरूवार 04 नोव्हेंबर 2021 चंद्रोदयी पहाटे 5 वाजून 49 मिनिटे. चंद्रोदयीचे वेळी पहाटे सुगंधी तेल व उटणे अंगाला लावून अभ्यंगस्नान करावे. पिता असणाऱ्या व्यक्‍तींनी पाण्यात अक्षता टाकून स्नान करावे व इतरांनी पाण्यात तिळ टाकून स्नान करावे. स्नानानंतर दक्षिणेकडे तोंड करून यमदेवतेला पुढील चौदा (१४) नावांनी अर्घ्य द्यावे.

1. यमाय नम: यमं तर्पयामि।

2. धर्मराजाय नम: धर्मराजं तर्पयामि।
3. मृत्यवे नम: मृत्यूं तर्पयामि।

4. अन्तकाय नम: अन्तकं तर्पयामि।

5. वैवस्वताय नम: वैवस्वतं तर्पयामि।

6. कालाय नम: कालं तर्पयामि।

7.सर्वभुतक्षयाय नम: सर्वभुतक्षयं तर्पयामि।

8. औदुंबराय नम: औदुंबर तर्पयामि।

9. दघ्नाय नमः दघ्नं तर्पयामि।

10. नीलाय नम: नीलं तर्पयामि।

11. परमेष्ठिने नम: परमेष्ठिनं तर्पयामि।

12. वृकोदराय नम: वृकोदरं तर्पयामि।

13.चित्राय नम: चित्रं तर्पयामि।.

14. चित्रगुप्ताय नमः चित्रगुप्त तर्पयामि।

चित्रगुप्ताय नंतर दक्षिणेकडे तोंड करून पुढील श्लोक दहा वेळा म्हणावा. त्यामुळे आयुष्यवृध्दी होते.

यमो निहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च काल:।
भूताधिपोदत्त कृतानुसारी कृतांत एतत्त्शिभिर्जपती।।

लक्ष्मी कुबेर पूजन (दीपावली) – अश्‍विन कृष्ण 30. गुरुवार 04 नोव्हेंबर 2021.
दुपारी 12.25 ते दुपारी 03.15 मि. पर्यंत, सायंकाळी 4,40 ते 10.15 ते रात्री पर्यंत उत्तररात्री. 12.25 ते 1.50 पर्यंत शुभदायक कालावधी राहील. मुहुर्त रात्री -6.33 ते 8.33 ही उत्तम मुहूर्त (वृषभ लग्न) या दिवशी दीपपूजा व दीपदान केल्याने अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते.

अन्नकूट गोवर्धन पूजन : 29.07 पर्यंत (पहाटे पाच वाजून सात मिनिटांपर्यंत) (1) शुक्रवार 05 नोव्हेंबर 2021 विविध मिठाई व भाजीपाला व पुरीचा नैवेद्य दाखवण्याची पध्दत आहे व गायीची पूजा करून अन्नकुटाचा नेवेद्य करून देवाला अर्पण केला जातो.

कार्तिक शुक्‍ल 1 शुक्रवार 05 नोव्हेंबर 2021.

बलिप्रतिपदा / वहीपूजन / दीपावली पाडवा / पतीस ओवाळणे

वही पूजनाचा मुहूर्त : पहाटे 3.50 ते 6.40 पर्यंत, सकाळी 8.05 ते 10.05 पर्यंत, दुपारी 12.20 ते 01.45 पर्यंत

पाटावर बलीची प्रतिमा तांदुळाने काढून त्यांची पूजा करावी. जमाखर्चाच्या नविन खरेदी केलेल्या बह्याची पुजा करून लिखाणास सुरूवात करावी. या दिवशी पहाटे स्त्रियांनी पतीला अभ्यंगस्नान घालून ओवाळावे व मिष्ठान्नाने भोजन करावे. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नानानंतर नरक चतुर्दशीला सांगितल्याप्रमाणे चित्रगुप्त व यमदूतासह यमदेवतेचे तर्पण करावे. यामुळे आयुष्यवृद्धी होते.

यमद्वितीया / भाऊबीज : कार्तिक 02. शनिवार 06 नोव्हेंबर 2021  या दिवशी बहिणीकडून अभ्यंगस्नान करावे व बहिणीला भेटवस्तू द्यावी.

तुलसी विवाह : 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2021 या काळात सूर्यास्ताचे वेळी तुलसीचा श्रीकृष्णाबरोबर विवाह लावण्याची पद्धत आहे.

वैकुंठ चतुर्दशी : गुरूवार 18 नोव्हेंबर 2021 या रात्री आवळीच्या झाडाखाली श्री विष्णूचे तुलसीपत्राने पूजन करावे व पहाटे सूर्योदयाचे वेळी सहस्त्र बिल्वपत्राने श्री शिवाचे पूजन करावे.

त्रिपुरारी पौर्णिमा : कार्तिक 15. गुरुवार 18 नोव्हेंबर 2021. सायंकाळी सूर्यास्तानंतर 750 त्रिपुर वाती आवळ्यावर लावाव्यात. या दिवशी त्रिपुरासूराचा वध झाला म्हणून वाती लावून दीपोत्सव साजरा करतात.

कार्तिक स्वामी दर्शन पूजन : कार्तिक शु. 14 गुरुवार 18 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 25.29 पासून (उत्तररात्री एक वाजून 29 मिनिटे) शुक्रवार 19 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 14.28 पर्यंत.कृत्तिका नक्षत्र असल्याने या योगावर कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे. प्रथम स्नान करून स्वामींचे दर्शन घेऊन दर्भ, चंदन, फुले, दशांगधुप, दीप, अर्पण करून कार्तिक यांचे वाहन मयूर यांची पूजा करावी. वर्षातील या एकाच दिवशी स्त्रियांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. या दिवशी कार्तिक स्वामींची विधीवत पूजा केल्याने कुबेरासारखी संपत्ती मिळते, असे शास्त्राचे विधान आहे.

इति शुभं भवतु 

– उमेश स्वामी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.